Tuesday, September 18, 2007

..मी....??

काही प्रवाहाच्या दिशेने पोहतात..
काही विरुद्ध दिशेने पोहतात..
पण प्रवाहाचा ओघच बदलण्याची क्षमता असते केवळ एखाद्याच थेंबात..
मला तो थेंब बनायचयं!


एखादा कष्टकरी आपल्या कुटुंबासाठी कष्ट करणारा..
त्यांच्यासाठी रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यन्त लढणारा,
त्याच्या रक्ताचा तो अखेरचाच थेंब...
तोच तो...!
हरण्याची खात्री असतानाही लढण्याची जिद्द् देणारा..!!!!!
मला तो रक्ताचा थेंब बनायचयं!


जगात सगळ्यात गतिवान कोण?
प्रकाश?
अं हं...
माणसाचा अखेरचा श्वास..!
जन्म आणि म्रुत्यु यांच्यातले अनंत अंतर क्षणात पार करणारा!
कधी बिभत्स तर कधी कारुण्यकारक..
तरीही थरारक,वेगवान!
मला तो श्वास बनायचयं!


जगात माणूस होणं कठीण असलं तरी अशक्य नाही...
मला अशक्य शक्य करायचयं!
मला great व्हायचय...
मला मोठ्ठ्ठ व्हायचयं!
YES,I CAN DO IT!
मी मोठा होणार...!!!
मी GREAT होणार!

No comments: