Monday, September 17, 2007

प्रश्न!

प्रश्नाचं उत्तर काय याचा विचार तो करत होता..
एक शहाणा वेड्यासारखा प्रश्नाचं उत्तर शोधत होता!

त्याने पहिल्याला प्रश्न विचारला..
तर तो भांबावल्यागत झाला!
दुसयाला????????
त्याला तर प्रश्नच कळला नाही..
तिसरा त त प प करत काहीतरी बडबडला..

साला,हे प्रश्न आणि उत्तर म्हणजे वाळ्वंट आणि म्रुगजळ..
जितके जवळ जावे तितके धोका देऊन दुर जातात..

प्रश्न..
प्रश्न!!
???????
!!!!!!!!!

शाळेत परिक्षेत प्रश्न..
मग युवकांचे प्रश्न..
मग संसारातले प्रश्न..
शेवटी पडला आयुष्याचा प्रश्न(???????)


प्रश्नांची उत्तरं शोधताना तो वेडा झाला..
एक शहाणा वेड्यासारखा विचार करत वेडा झाला...
हो,
पण वेडा होताना आपलं शहाणपण आणखी एकाला देऊन गेला..
कशासाठी????
प्रश्नाचं उत्तर शोधण्यसाठी..!


मग पुन्हा...
एक शहाणा वेड्यासारखा प्रश्नाचं उत्तर शोधत होता!
प्रश्न....
प्रश्न????
प्रश्न!!!!!!!!

No comments: