Monday, September 17, 2007

दुनियादारीतल्या सगळ्यात आवडलेल्या ओळी...!

पतंग आपला फाटतोय,गोते खातोय..
त्याला खाली हापसायचा..
पुन्हा ठिगळं लावून पुन्हा उडवायचा..
पतंगाचा मांजा तुटला की सारी पोरं कशी "है" करून धावतात..आपणही जिवाच्या आकांतानी पळत सुटायचं..

"ए सोड भै***,हात तोडून टाकेन"

भरल्या छातीने,पेटके आलेल्या पोटऱ्यांनी आपण पुन्हा जागेवर यायचं,
तुटक्या मांज्याला पक्क्या गाठी मारायच्या...
पुन्हा पतंग आकाशात...!

केवढा रे बाबा हा सोस...???????????

तर
तो फाटका,तुटका कसाही का असेना?
आमचाही पतंग आकाशात उडतो आहे...!

देख...

"तिच्यायला,त्यापेक्षा त्या ठिगळं लावलेल्या,गाठी मारलेल्या पतंगाची राख करा आणि द्या चिमुट चिमुट त्या पळणाऱ्यांच्या हातात...प्रसाद म्हणून खा म्हणावं,नाहीतर लावा आपापल्या कपाळाला,आकाशात एका नवीन पतंगाला जागा झाली म्हणून"

No comments: